साऱ्या देशाचा पोशिंदा का आहे दुःखी ?

साऱ्या देशाचा पोशिंदा का आहे दुःखी ?

सध्या देशात कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहे. आज दिल्लीच्या प्रवेशद्वाराजवळ आलेल्या शेतकरी आंदोलकांना अडवण्याचा प्रकार केंद्रातील सरकार करत आहे. पण आज शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याला कोणी वाली आहे का? कारण आज शेतकऱ्यांवर होणाऱ्या आंदोलनांच्या आड लपून काही राजकारणी लोक आपली राजकीय पोळी भाजून घेताना दिसत आहे.


आज कृषी प्रधान म्हणून म्हंटल्या जाणाऱ्या देशातील बळीराजावरच संकट ओढवलेले आहे. हे या देशाचे मोठे दुर्दव्य आहे. पण आज शेतकरी वर्ग का ? आंदोलन कात आहे. त्याच्या प्रमुख मागण्या काय, त्याला काय हवे आहे याचा साधा विचार करण्याची वृत्ती आणि बुद्धी आजच्या सरकारकडे नसलेली दिसून येत आहे.

आज देशभरात जागोजागी आंदोलन करण्याऱ्या शेतकऱ्यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख करून आपल्या पोशिंद्यालाचं बदनाम करण्याचे कट-कारस्थात हे सरकार रचताना दिसून येत आहे. आज कृषिप्रधान म्हणूंन साऱ्या जगभरात मिरवण्याऱ्या भारतातील शेतकऱ्यांवर देशात आंदोलन करण्याची वेळ येणे म्हणजेच या सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे. मात्र याचा या सरकारला काडीमात्र फरक नाही

ग्लोबल न्युज नेटवर्क: