इतक्या बंदोबस्तात आमदारांना का आणलं जातंय? अतिरेकी कसाबलासुद्धा असं आणलं नसेल

मुंबई : इतक्या बंदोबस्तात आमदारांना का आणलं जातंय? अतिरेकी कसाबलासुद्धा असं आणलं नसेल असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारची आज विधानभवनात अग्निपरीक्षा असणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. यामध्ये भाजपकडून राहुल नार्वेकर असणार आहेत. दोन दिवसाच्या विशेष अधिवशेनात सहभागी झालेले माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपकडून (BJP) आमदारांना बंदोबस्तात आणल्यावरून टीका केली आहे. बसमधून आणल्या जाणाऱ्या आमदारांबाबत वाईट वाटतंय. इतक्या बंदोबस्तात आमदारांना का आणलं जातंय? अतिरेकी कसाबलासुद्धा असं आणलं नसेल असं आदित्य ठाकरे म्हणाले.

 

विधानभवन परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की,”आमदारांमध्ये आणि माध्यमात दोरी लावली आहे. याआधी असं नव्हतं कधी. सरकारचा सगळा बंदोबस्त आहे. विधानभवन परिसरात इतका बंदोबस्त पहिल्यांदा आहे. मुंबईत इतका कडेकोट बंदोबस्त पाहिला नव्हता.”

शिवसेनेचं विधानभवनातलं कार्यालय सील करण्यात आल्याचं समोर आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी आम्हीच कार्यालय बंद केल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले की, “पुन्हा विधानभवनात यायंच आहे म्हणून आम्हीच कार्यालय बंद केलंय. आमच्या कार्यालयाची चावी आमच्याकडे आहे. अहो काही लोकांना इतर ठिकाणी नेवून बंद करून ठेवलं. आमचं काय विचारताय.” तसंच व्हीपबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, शिवसेनेचा, सुनिल प्रभू यांचाच व्हीप अधिकृत असेल.

आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी सरकारला केली. आरेच्या आंदोलनाला जाऊ शकलो नाही कारण विधानभवनाचे आज कामकाज आहे. इथं आल्याने गेलो नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्ष खोचक टोलाही देवेंद्र फडणवीस यांना लगवाला. “माझी पुन्हा एकदा सरकारला विनंती असेल, सॉरी पुन्हा नाही, परत.” यावेळी त्यांनी ‘पुन्हा’ शब्दावर जोर दिला.

आदित्य ठाकरे यांनी आरेच्या जंगलाला आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईला तरी धोका देऊ नका, आम्हाला दिलात ठिक आहे. आरेचं जंगल मुंबईसाठी महत्त्वाचं आहे. आरेला दोन पर्याय आहेत. या पर्यायावर काम सुरू होतं. पण सरकारचा पहिला निर्णय मुंबईवर घाला घालणारा असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: