कोण जिंकणार ? कोण हरणार ? हे वेळ आल्यावर सांगेल, महापौर पेडणेकर यांचा भाजपाला टोला

 

मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखायी जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती . यावेळी मंत्री नारायण राणे यांनी मुंनबाई महानगर पालिका निवडणुकीवर भाष्य करताना शिवसेनेला जोरदार टोला लगावला होता. आता या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार? हे वेळ सांगेल. इतरांनी हे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांचे नाव न घेता जोरदार टोला लगावला होता. हा जनआशीर्वाद नाही, तर जन छळवणूक आहे, अशी टीकादेखील महापौरांनी केली.

नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राजकीय शक्तिप्रदर्शन केले. किशोरी पेडणेकर यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, कोणतीच निवडणूक सोपी आहे असे आम्ही कधीच म्हटले नाही. कारण दर निवडणुकीला इतिहास आणि भुगोल वेगळा असतो. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. आमचा फोकस ठरला आहे. कोणावर टीका करण्यापूर्वी आपण आपला प्रवास बघितला पाहिजे. आपल्याला अशी टीका करण्याचा अधिकार कोणी दिला? याचा विचार केला पाहिजे.

Team Global News Marathi: