कोण होणार राज्याचे मुख्य सचिव? कुंटे-परदेशी यांची नावे आघाडीवर

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार येत्या महिनाअखेर निवृत्त होत असून त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि संयुक्त राष्ट्रसंघात प्रतीनियुक्तीवर असलेले प्रवीणसिंह परदेशी यांची नावे आघाडीवर आहेत.

 

 

संजय कुमार यांना मुदतवाढ देण्यास मुख्यमंत्र्यांची तयारी होती. मात्र संजय कुमार महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी) अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ते मुदतवाढ घेण्याची शक्यता फार कमी आहे. प्रवीणसिंह परदेशी आणि सीताराम कुंटे दोघे 1985 च्या बॅचचे आयएएस आहेत. या दोघांमध्ये चुरस आहे. नव्या मुख्य सचिवांना 9 महिन्यांचा कालावधी लाभणार आहे. राज्य केडरमध्ये मुख्य सचिव हे सर्वेच्च पद आहे. मात्र दोघांची निवृत्ती एकाच दिवशी असल्याने कुंटे-परदेशीपैकी एकास या सर्वेच्च पदाला कायमचे मुकावे लागणार आहे.

दोघांमधील साम्य
सीताराम कुंटे आणि प्रविणसिंह परदेशी दोघे मराठी अधिकारी आहेत. दोघांची 1985 बॅच आहे. दोघांची जन्मतारीख 3 नोव्हेंबर 1961 आहे. दोघे एकाच दिवशी महाराष्ट्र केडरमध्ये रुजू झाले. परदेशी सकाळी आणि कुंटे दुपारी रुजू झाले. दोघांकडे अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी आहे. परदेशी सोलापूरचे तर कुंटे सांगलीचे आहेत.

 

राजकीय पार्श्वभूमी
सीताराम कुंटे हे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले. फडणवीस सरकारच्या काळात कुंटे मागे पडले. प्रविणसिंह परदेशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. फडणवीस सरकारच्या काळात परदेशी हे मुख्यमंत्री कार्यालयचे अतिरिक्त मुख्य सचिव होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: