तुमचा विश्वासू कोण ते…’ ED च्या कोठडीतून संजय राऊतांची लढायची भाषा, विरोधकांना पत्र

 

‘तुमचा विश्वासू कोण ते…’ ED च्या कोठडीतून संजय राऊतांची लढायची भाषा, विरोधकांना पत्र

पत्रा चाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी इडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. इडीच्या कस्टडीमध्ये असलेल्या संजय राऊत यांनी विरोधकांना पत्र लिहून आपल्याला पाठिंबा दिल्याबाबत धन्यवाद दिले आहेत.

संजय राऊत यांनी या पत्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आप, सीपीआय आणि सीपीआय-एम या विरोधी पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिल्याबाबत त्यांचे आभार मानले आहेत.

तुमचा विश्वासू सहकारी कोण हे कठीण काळातच दिसतं, असं संजय राऊत विरोधकांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत.

‘केंद्र सरकारने केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून राजकीय सूडबुद्धीने मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. या काळात तुम्ही मला दिलेल्या पाठिंब्याबाबत धन्यवाद. सत्यासाठीची माझी लढाई सुरूच राहील. मी दबावासमोर झुकणार नाही तसंच या लढाईमध्ये मी तुटणारही नाही,’ असं संजय राऊत या पत्रात म्हणाले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: