गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागलेले भूपेंद्र पटेल कोण आहेत ; वाचा सविस्तर-

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागलेले भूपेंद्र पटेल कोण आहेत ; वाचा सविस्तर-

विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री कोण असणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज भाजपनं गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली.

भूपेंद्र पटेल हे गुजरात विधिमंडळाचे नेते म्हणून निवडले गेले असून आज ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

 

‘भूपेंद्र पटेल यांचे ना कुणी मित्र, ना शत्रू’

“विजय रूपाणींना राजीनामा द्यायला सांगितलं गेलं, याचं प्रमुख कारण म्हणजे भाजपला गुजरातमध्ये ‘पटेल’ चेहरा हवा होता.”

“आगामी विधानसभा निवडणुकीत इतर कुठल्याही समाजापेक्षा पटेल समाज आपल्या बाजूने हवा, हे भाजपला चांगलं ठाऊक आहे. कारण पटेल समाजाच भाजपला गेल्या दोन-अडीच दशकांपासून चांगला पाठिंबा मिळत आलाय. पटेल समाजातला मोठा गट पाटीदार आरक्षणासाठी संघर्ष करताना दिसतोय,”

 

तसंच, “नितीन पटेल किंवा तत्सम नेत्यांना पक्षातूनही विरोध होण्याची शक्यता होती. मात्र, भूपेंद्र पटेल हे पूर्णपणे नवीन नेते, पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत. त्यांना पक्षातही विरोध नाहीय. अहमदाबाद महानगरपालिकेत त्यांनी मोठं पद भूषवलंय. जमिनीसंदर्भातल्या व्यवसायात ते आहेत. भूपेंद्र पटेल यांचे पक्षात कुणी फार मित्रही नाहीत आणि कुणी शत्रूही नाहीत. भूपेंद्र पटेल यांना लोकनेते म्हणता येणार नाही. मात्र, पटेल समाजासाठी ते भाजपला सावरून नेऊ शकतात, असं त्यांच्याकडे पाहिलं जातंय,” असंही अंकुर जैन सांगतात.

कोण आहेत भूपेंद्र पटेल?

भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. ते पाटीदार समाजाचे नेते आहेत. पटेल हे 59 वर्षाचे आहेत. ते अहमदाबादच्या शिलाज येथील रहिवासी आहेत. त्यांनी सिव्हील इंजीनियरिंगचा डिप्लोमा केला आहे.

लॉटरी लागली

भूपेंद्र पटेल हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग राहिला आहे. 1999-2000 मध्ये ते मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 2010 ते 2015 पर्यंत ते थलतेज वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

2015-17मध्ये ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. तसेच 2008-10 मध्ये ते एएमसी स्कूल बोर्डाचे उपाध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर साडे तीन वर्षानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ते पटेल संघटनांच्या सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशनचे ट्रस्टीही आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्याने ते पाटीदार समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठी भूमिका निभावू शकतात.

 

भूपेंद्र पटेल हे 2017 साली गुजरात विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत.ते गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे विश्वासू समजले जातात.

भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. या मतदारसंघातून पूर्वी आनंदीबेन पटेल (उत्तर प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल) निवडून येत असत.

तब्बल एक लाख 17 हजार मतांच्या फरकाने ते आमदार म्हणून विजयी झाले होते. काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा त्यांनी पराभव केला होता.

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: