किमया शेअर बाजाराची: एका महिन्यात पैसे झाले तब्बल पाच पट, २ रुपयांचा हा शेअर पोहचला साडेनऊ रुपयांवर !

मुंबई: मागील काही महिन्यात पेनी शेअर्सनी (Penny stock) गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. छोट्या शेअर्समधून मोठी कमाई करता येते मात्र अशा गुंतवणुकीत मोठा धोका असतो.  या प्रकारच्या शेअर्सची संख्या कमी असते. त्यामुळे यात चढउतार जास्त असतात. मात्र काही शेअर्स ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असते, ते गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून देऊ शकतात.

सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. (Supremex Shine Steels Ltd) हा शेअर असाच एक दमदार शेअर आहे. हा शेअर सध्या तेजीत आहे. आजदेखील या शेअरला अप्पर सर्किट लागले होते. हा पेनी स्टॉक यावर्षी मल्टीबॅगर शेअर (Multibagger stock) बनला आहे. यावर्षी या शेअरने गुंतवणुकदारांना कित्येक पटींनी नफा कमावून दिला आहे. शेअर बाजाराने (Share market) वर्षभरात दाखवलेल्या अभूतपूर्व तेजीमुळे अनेक छोटे शेअर्स मल्टीबॅगर्स बनले आहेत.  (Share Market: Multibagger stock of Supremex Shine Steels Ltd turned Rs 1 lakh into Rs 5 lakhs in 1 month)

गुंतवणुकदारांची झाली तुफान कमाई

सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. च्या शेअरने महिनाभरात जवळपास ३६१ टक्क्यांचा भरघोस परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. १ नोव्हेंबर २०२१ ला या शेअरची किंमत २.०७ रुपये प्रति शेअर होती. सध्या हा शेअर ९.५५ रुपये प्रति शेअर (Share price of Supremex Shine Steels Ltd) या पातळीवर होता. जवळपास दीड महिन्यात या शेअरच्या किंमतीत जवळपास ५ पट वाढ झाली आहे. या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणुकदारांना मोठी संपत्ती कमावण्याची संधी दिली आहे.

यावर्षी छोट्या आणि मध्यम श्रेणीतील शेअर्सनी मोठा परतावा दिला आहे. शेअर बाजारातील तेजी छोट्या आणि मध्यम श्रेणीतील शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे. महिनाभराच्या कालावधीत या शेअरने ३६१ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. फक्त एका महिन्यापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास ५ लाख रुपये झाले आहे.कंपनीची स्थापना २०११ मध्ये झाली होती.

शेअर बाजाराची दिशा आणि तुम्ही

शेअर बाजाराचे आकर्षण छोट्या गुंतवणुकदारांना भुरळ घालते आहे. शेअर बाजारात सध्या चढ उतार सुरू आहेत. जागतिक शेअर बाजारावर जागतिक घटकांचा परिणाम होतो आहे. अर्थात बाजारातील घसरणीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आपल्या विक्रमी पातळीवरून खाली आले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज वाढ झाली आहे. या वर्षभरात शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी नोंदवली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. अर्थात  शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच ग्लोबल न्यूज मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ग्लोबल न्युज नेटवर्क: