सोमय्यांच्या रडारावर हसन मुश्रीफ; शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा केला आरोप

 

राज्यत आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून किरीट सोमय्या राज्यातील अनेक मंत्र्यांवर, खासदार आणि आमदार एकण्यावर घोटाळ्याचे आरोप लगावत असून आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचये नाव जाहीर केले आहे. या आरोपांमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गे चे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद आणि पत्नीवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ परिवारानं शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. त्याचे पुरावे मी आयकर विभागाला सादर केले आहेत. सीआरएम सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडमधून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं कर्ज घेतलं असल्याचं दाखवलं आहे. असे सोमय्यांनी म्हंटल.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात ताहेरा हसन यांच्या नावानं शेअर्स असल्याचं समोर आलं आहे. २०१७ मध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर आयकर विभागाचा छापा पडला. त्यात १२७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Team Global News Marathi: