97 पैशांचा स्टॉक पोहचला 194 वर; 1 लाखाचे झाले तब्बल 2 कोटी

97 पैशांचा स्टॉक पोहचला 194 वर; 1 लाखाचे झाले तब्बल 2 कोटी

मुंबई : जर तुम्हालाही शेअर बाजारात (Stock Market)मध्ये पैसे गुंतवणूक चांगली कमाई करायची असेल तर, अचुक शेअरची निवड करणे गरजेचे ठरते. योग्य शेअरची निवड तुम्हाला दमदार रिटर्न मिळवून देऊ शकतो. काही शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. या शेअर्सने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. असाच एक शेअर म्हणजे Dihjam होय. हा एक टेक्सटाइल इंडस्ट्रीजशी संबधीत शेअर आहे. मागील ३ वर्षात 0.97 रुपयांनी वाढून तो 197 रुपयांवर पोहचला आहे.

1 महिन्यात 66 रुपयांवरून 194 रुपयांवर
Dihjam शेअरच्या चार्टवर नजर टाकल्यास लक्षात येते की, मागील एका महिन्यात शेअर 66 रुपयांनी वाढून 194 रुपयांव पोहचला आहे. 1 महिन्यात शेअर साधारण 90 टक्क्यांनी वाढला आहे. मागील 3 महिन्यात हा स्टॉक 17.27 रुपयांनी वाढून 194 रुपयांवर पोहचला आहे.

 

याप्रमाणे 1 वर्षात हा शेअर 3.98 रुपयांनी वाढून 194 रुपयांवर आला आहे. या अवधीत शेअरमध्ये 4800 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

 

1 लाखाचे झाले 3 कोटी

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक महिन्यापूर्वी 1 लाख रुपयांचे शेअर खरेदी केले असते. तर आज 1.90 लाख झाले असते. त्याचप्रमाणे गुंतवणूकदाराने 3 वर्षापूर्वी शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर, आज त्याला 2 कोटी रुपयांचा परतावा मिळाला असता.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: