कोण किती पाण्यात आहे हे यावरून सिध्द होतं” – सुप्रिया सुळे

 

पुणे | अंमलबजावणी संचालनालयाचा आणि अन्य केंद्रीय यंत्रणांचा भाजप सरकार सातत्याने गैरवापर करत आहे. यावर मी सातत्याने संसदेत बोलत आहे, आवाज उठवत आहे.केंद्र सरकारच्या विरोधात बोललात, विरोधात असलात तर तुम्हाला नोटीस येतात. पण, भाजपमध्ये गेलात की त्या नोटीस विरघळतात अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. भाजपमधल्या एकाही नेत्याला आत्तापर्यंत यंत्रणांच्या चौकशीला सामोर जाव लागलेलं नाही. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे हे यावरून सिध्द होतं, असंही त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्हाला तीन वाजायच्या आत जी काही पब्लिसिटी करून घ्यायची असेल ती करून घ्या. जे काही आरोप करायचे आहेत, ते करून घ्या. कारण तीन वाजल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत तुमच्यावर आरोप करणार आहेत. ते तुम्हाला टेक ओव्हर करणार आहेत.

पुढे छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणावर बोलताना सुळे म्हणाल्या की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे यांनी येत्या २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु, खासदार संभाजीराजे यांच्याशी मी वैयक्तिक बोलेन. त्यांच्या काय वेदना आहेत हे समजून घेईल. किंबहुना यावर सगळ्यांनीच बोललं पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

Team Global News Marathi: