खासदार संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेआधी मुंबईत ईडीची छापेमारी

 

मुंबई | खासदार संजय राऊत यांच्या आज होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शिवसेना कोणता गौप्यस्फोट करणार? शिवसेना नेमका कोणता बॉम्ब फोडणार? आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजणार का? भाजपाची ती साडेतीन लोकं कोण? यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना, व राज्याचे लक्ष सेनेच्या पत्रकार परिषदेकडे लागले असताना आज मुंबईत ईडीने छापेमारी केली आहे. यावरुन आता राजकारण रंगताना दिसत आहे.

दरम्यान, ईडीने नेमक्या आजच्याच दिवसाचे औचित्य साधून मुंबईत छापेमारी का? केली असावी अशी जोरदार चर्चा रंगत आहे, त्यामुळं ईडीच्या छापेमारीवरुन वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या चौकशीमागे कोणती कारणे असू शकतात? राज्य सरकारवर कुरघोडी करण्यासाठी म्हणून ईडीने छापेमारी केली असल्याचं बोललं जात आहे. अंडरवर्ल्ड लोकांशी राजकीय नेत्यांच्या आर्थिक संबंधावरुन इडीने छापेमारी केल्याचं बोललं जात आहे. तसेच त्या नेत्यांच्या पक्षाचे तसेच त्या नेत्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी छापेमारी केल्याची शंका वर्तविण्यात येत आहे.

दाऊद इब्राहिमचा सध्या तुंरुगात असलेल्या भाऊ इक्बाल कासकर, तसेच हसीना पारकर यांच्याशी दोन बड्या राजकीय नेत्यांचा संबंध असल्याचं बोललं जात आहे, या बड्या दोन राजकीय नेत्यांनी गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांशी मनी लॉन्ड्रीग तसेच आर्थिक व्यवहार केल्याची दाट शक्यता असल्याचं ईडीच्या सुत्रांनी म्हटलं आहे,

Team Global News Marathi: