पवार कुटुंबाच्या जावयाकडे एवढे पैसे कुठून आले, सोमय्या यांनी उपस्थित केला सवाल

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात चांगलेच शीतयुद्ध पेटलेले आहे. त्यातच आज मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लगावला होता. याच पार्श्वभूमीवर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या टीकेला सडेतोड उत्तर देत थेट पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख करत टीका केली आहे.पवारांच्या नातलगांच्या घरी सुरू असलेल्या ईडीच्या धाडीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी अजित पवारांनी नवाब मलिकांना पुढे आणले आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

19 दिवसांपासून ईडी आणि आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. नवाब मलिकांची एवढी कपॅसिटी नाही, हे घाणेरडं राजकारण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं आहे. ज्यावेळी समीर वानखेडे यांना नोकरी लागली तेव्हा तुम्ही काय करत होतात? असा सवाल सोमय्या यांनी नवाब मलिक यांना प्रश्न विचारला. फडणवीस यांच्यावर आरोप करत नवीन मुद्दा उकरुन काढलाय. आधी अजित पवार यांच्या बेनामी संपत्तीबद्दल उत्तर द्यावं, असं किरीट सोमय्या म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून पवारांच्या नातेवाईकांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे, त्याचा संबंध अजित पवारांशी आहे. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्यात झालेला घोटाळा आणि सुरू असलेल्या कारवाईवरून सर्वांचं लक्ष विचलीत व्हावं, यासाठी नवाब मलिकांना पुढे आणलंय आणि ते समीर वानखेडेंवर आरोप करत आहेत. दरम्यान, पवार कुटुंबीयाचे जावई मोहन पाटील यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.

Team Global News Marathi: