मिसेस मुख्यमंत्री जेंव्हा आर टी ओ कार्यलयात जातात

मिसेस मुख्यमंत्री जेंव्हा आर टी ओ कार्यलयात जातात

मुंबईच्या च्या RTO कार्यालयात एक महिला चालत आली..तिच्या वाहनचालक परवान्याची मुदत संपत आली होती व त्याचे नुतनी करण करायचे होते…
त्या महिलेने अर्ज घेतला तो व्यवस्थित स्वहस्ते भरला कागदपत्रे घेउन ती अनुज्ञाप्ती मिळवण्याच्या रांगेत उभी राहीली..हळुहळू क्रमांक पुढे सरकत होते..त्या महिलेची कागदपत्रे घेतली गेली..तिने पैसे भरले.अनुज्ञाप्राप्ती साठी फोटोही काढून घेतला..सर्व प्रक्रिया आटोपून ती महीला RTO बाहेर पडणार तोच क्लार्क ने कागदपत्र वाचली नाव #रश्मीजी_उद्धवजी_ठाकरे

तो उडालाच..म्हणजे महाराष्ट्र च्या मुख्यमंत्र्याच्या पत्नी रांगेत उभी होती इतका वेळ..मग पळापळ सुरु झाली मु RTO .ARTO कार्यालय नव्हते ..तिसऱ्या क्रमांकाचे अधीकारी पार्किंग पर्यत पळत आले नमस्कार चमत्कार झाले ना विनंती केली की त्यांनी कार्यालयात यावे.त्याच्या परवाण्याचे त्वरीत नुतनी करण करुन देण्यात येईल ..

सौ.मुख्यमंत्रीयांनी गोड शब्दांत नकार दिला.मी अर्ज भरला आहे पैसेही भरले आहे आणि माझा फोटो ही काढला आहे.आता तुमच्या नियमानुसार मला स्पिड पोस्टने परवाना पाठवा..गाडी सुरु करुन बाय म्हणत त्या निघुनदेखील गेल्या ..एव्हाना अधीकार्- याचे कपाळ घामाने थबथबले होते..मुख्यमंत्र्यांची पत्नी अन रांगेत RTO कार्यालयात उभी राहाते यावर विश्वास बसत नव्हता .

ग्लोबल न्युज नेटवर्क: