राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजपा नेते आणि माजी आमदार गिरीश महाजन यांच्यात वायरल सभाषांवरून चांगलाच वाद पेटलेला दिसून येत आहे. त्यात आता खडसे-महाजन या दोघं नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केल्या आहेत. त्यात महाजन यांनी खडसेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचे वक्तव्य केल्यानंतर खडसे यांनी देखील त्याला सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
खासदार महाजन यांना उद्देशून म्हणाले की ‘माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. गिरीश भाऊ यांना खात्री करायची असेल तर ते करू शकता’, असं खडसे म्हणाले आहेत. तसेच गिरीश महाजन यांचा आपल्याला सर्व इतिहास माहिती असून त्यांना राजकारणात जन्माला मी आणलं, असे मोठं विहदन खडसे यांनी केले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात या दोन नेत्यांमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘मी जे ऑडिओ रेकॉर्डमध्ये बोललो आहे, जामनेर मतदारसंघातून मला नागरिकांचे फोन येत आहेत. तालुक्यात पाणीटंचाईची समस्या आहे. कोरोनाच्या काळात दिवसेंदिवस तिथे रुग्णांचे अक्षरक्ष: मुर्दे पडत आहेत. नागरिकांच्या अनेक समस्या तालुक्यात आहेत. गिरीश महाजन तिकडे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. तालुक्यातील नागरिक माझ्याकडे संताप व्यक्त करत आहेत. 1994, 1995 मध्ये फरदापूर येथे गिरीश महाजन यांची काय घटना घडली होती ती मला आणि जनतेलाही माहिती आहे. त्यांचा पूर्ण इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही’, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला.