सुधीर मुनगंटीवार यांनी सोनाराचा धंदा कधी सुरू केला? अनिल परब यांचा पलटवार

सुधीर मुनगंटीवार यांनी सोनाराचा धंदा कधी सुरू केला? अनिल परब यांचा पलटवार

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर वारंवार टीका करताना पहायला मिळत आहेत. आज भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटलं, आत्ताची शिवसेनेचा 24 कॅरेटची राहिलेली नाहीये. भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेल्या या विधानानंतर त्याला शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची २४ कॅरेटची शिवसेना राहिलेली नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. यावर मुनगंटीवार यांनी सोनाराचा धंदा कधीपासून सुरू केला? असा उलट सवाल परब यांनी विचारला आहे. आपण राजकारणी आहोत, राजकारण करावे, कॅरेटबिरेट तपासण्याचे काम मुनगंटीवार यांचे नाही, अशा शब्दात परब यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहे.

राज्यात मागील दोन वर्षांत तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मात्र तरीही ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर २५ हजार प्रतिहेक्टर मदत देण्याचे आश्वासन दिले. क्या हुआ तेरा वादा? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा – अनिल परब

अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हटलं, हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर कर्मचाऱ्यांनी आपले मत मांडावे असं मी नेहमी सांगत होतो. आज या समितीची पाच वाजता बैठक होत आहे. या बैठीकीनंतर एक अहवाल तयार करुन मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सुटू शकतो. एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा.

एसटी कर्मचाऱ्यांच्या 28 युनियनच्या कृती समितीसोबत मी चर्चा केलीय. मी कुणाशीही चर्चा करायला तयार आहे. बोलणी करायला येतात व जातात. पण ते परत येत नाहीत. एसटी बंद झाल्याने अवैध वाहतूक सुरू आहे. त्यामुळं एसटी बंद करू नका. हे परवडणारे नाही. विलिनीकरण मागणीवर तुर्तास पर्याय नाही. आम्ही तुमचे वैरी नाहीयेत असंही अनिल परब म्हणाले.

सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. विपदा परिस्थिती केवळ तीन हजार कोटी खर्च करतात; पण आव असा आणतात की तुम्हीच शेतकऱ्यांचे कर्तेधर्ते आहे, असा टोला शरद पवार यांचं नाव न घेता लगावला होता. तसेच मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरही टीका केली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: