मनसे सोबत आली तर वाईट काय ? राणे यांचे सूचक विधान

मनसे सोबत आली तर वाईट काय ? राणे यांचे सूचक विधान

राज्यात पदवीधर आणि शिक्षण मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना ,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारने भारतीय जनता पक्षाचा पराभव केला होता. त्यापाठोपाठ आता राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केली.

त्यातच आता महाविकास आघाडी, भाजपा, वंचित पाठोपाठ मनसेने सुद्धा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले होते. यावर भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सूचक विधान केले आहे.

पत्रकार परिषदे घेऊन निलेश राणे यांनी सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तसेच सेनेला लक्ष्य करत २०२४ साली कोकणातील सर्वच्या सर्व आमदार खासदार हे भाजपचे असतील अस भाकीत केले आहे.

तसेच, सर्व मित्रपक्षांसोबत स्थानिक निवडणुकांसाठी चर्चा करणार असून जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत आली तर वाईट काय?’ असे सूचक विधान केले आहे. दरम्यान, मनसेशी हातमिळवणी स्थानिक पातळीवर असेल असा उल्लेख देखील त्यांनी केला. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या १४२३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून १५ जानेवारीला मतदान होणार आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: