मुंबई | पुष्पा-द राईज हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. श्रीवल्ली त्या गाण्यातली अल्लू अर्जुनची स्टेप सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पुष्पा-द राईज चित्रपटातील अल्लू अर्जुनची भूमिका प्रचंड गाजतेय. त्याचा फायदा अल्लूला पुष्पाच्या पुढच्या भागात होणार आहे. पुष्पा-द राईज सिनेमाचा शेवट उत्कंठावर्धक होता. त्यामुळे आता चाहते पुष्पा-२ ची वाट पाहताहेत.
अल्लू अर्जुन’ने पुष्पा-द राईजसाठी त्यानं ५० कोटी रुपये मानधन घेतलं. पुष्पा चित्रपट प्रचंड हिट झाला. त्याचं हिंदी व्हर्जनदेखील हिट ठरलं. आता या यशाचा मोठा फायदा अल्लूला पुष्पा-२ मध्ये होणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अल्लू पुष्पा-द रूल १०० कोटी रुपये मानधन घेणार असल्याची चर्चा आहे.
पुष्पाच्या बंपर यशामुळे अल्लू अर्जुननं दक्षिणेतल्या अनेक कलाकारांना मागे टाकलं आहे. ज्युनियर एनटीआर दक्षिणेतला प्रख्यात अभिनेता. त्याचा RRR चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी त्यानं ४५ कोटी रुपये घेतले आहेत. याच चित्रपटात दिसणारा राम चरण तेजा ५० कोटी मानधन घेणार आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.