“तुमच्या सुखी संसाराचे रहस्य काय?” वाचाल अन विचार कराल..

“तुमच्या सुखी संसाराचे रहस्य काय?” वाचाल अन विचार कराल..

परवा, एका कार्यक्रमात एका प्रसिद्ध जोडप्याची मुलाखत ऐकली. मुलाखत घेणाऱ्याने विचारले “तुमच्या सुखी संसाराचे रहस्य काय?” पुढून उत्तर आले- खर सांगायचं तर आम्ही एकमेकांना त्याची त्याची space देतो, एकमेकांवर कोणतीच बंधन घालत नाही. एकमेकांच्या अपेक्षा एकमेकांवर लादत नाही. त्यामुळेच आम्ही खूप आनंदी आहोत आमच्या संसारात.”

उत्तर ऐकून मला खरच छान वाटले.त्यातून, त्यातील नवरा म्हणाला, आमच कधीच भांडण होत नाही. हे ऐकून तर खूपच हेवा वाटला. वाटलं – आपला संसार असा का नाही?

विचारचक्र फुल गोल गोल फिरायला लागले. 10 वर्ष्यातली सगळी भांडण आठवली. मग खरच पटलं की आपण एकमेकांकडून फार अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण नाही झाल्या की मग चिडचिड, भांडणं….ठरवलं….no अपेक्षा…आपलं आपण काम करत रहणे. एकमेकांना space देणे. ………मग त्यालाही सांगितलं – माझ्याकडून फार अपेक्षा करू नकोस . तू indepedant आहेस. तु मला माझी space दे मी तुला तुझी space देते. …..

भारी वाटलं थोडे दिवस. चिडचिड नाही भांडण नाही. पूर्ण महिना घर इतक शां..त… म्हणून सांगू खरच आता आमच्या सुखी संसाराची सुरवात झाली अस वाटायला लागलं. घरातली काम , नोकरितली काम कशी पटापट होत होती. मध्ये मध्ये ह्याची लुडबुड नाही, फर्माईशी नाहीत.

मग एका रविवारी, सगळी काम संपली. मी नवऱ्याला म्हणलं, चल बाहेर फिरून येऊ. तो म्हणाला नको मी web series बघतोय. मी म्हणले – काय रे अस?… चल ना कधी तरी. त्यांनी मला माझेच शब्द सुनावले- ठरलय ना आपलं एकमेकांना आपापली space देईची? मी एकदम निशब्द. मी मैत्रिणी ला फोन केला. आम्ही दोघी मस्त एका टेकडी वर फिरायला गेलो. खूप गप्पा मारल्या.

काही वेळाने माझ्या लक्षात आलं, कितिदिवसात आमच्या दोघांमध्ये अश्या सुख दुःखाच्या गप्पाच झाल्या नाहीत. मी विचार केला , जर मी ह्याला हट्ट करून फिरायला येईला लावले असते तर अश्या छान गप्पा आम्हाला दोघांना ही मारता आल्या असत्या.खर तर एकमेकांना space देण्याच्या नादात आम्ही एकमेकांशी बोललोच नाहीये गेला

महिनाभर.!!!! अगदीच कामाच बोललो असू फार तर फार. मग माझ्या लक्षात आले की, मी जर त्याच्याडून काही अपेक्षा केल्या नाहीत किव्वा त्यानी माझ्याकडून काही अपेक्षा केल्या नाहीत तर आमच नातं नातं राहणारच नाही ना?

मुलाखतीतल्या जोडप्याने सांगितलेली सुखी संसाराची व्याख्या ही सुखाची होऊ शकते पण ती सुखी संसाराची अजिबातच होऊ शकत नाही. आजकालच्या मूला मुलींनी “एकमेकांना space दिल्याने सुखी संसार होतो” ही व्याख्या गृहीत धरून संसाराला सुरवात केली तर ? तर त्यांचा संसार , संसार होणारच नाही. सुख मिळेलंही पण त्याला संसार म्हणता येणार नाही. आणि काही दिवसांनी आपल्या दोघांच एकमेकांशिवाय काहीच अडत नाहीये हे कळल्यावर मग divorce घ्यायला मोकळे.

मला वाटतं- एकमेकांना space देणे या पेक्षा एकमेकांच्या space मध्ये शिरून ती आपलीशी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुखी संसार. एकमेकांवर अपेक्षांचं ओझं न लादणे या पेक्षा एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊन किव्वा बोलून दाखवून त्याला ओझं न मानता आनंदाने आणि हक्काने त्या पूर्ण करणे किव्वा पूर्ण करून घेणे. म्हणजे सुखी संसार.

मला कळून चुकलं की इतक पण स्वावलंबी होण्याची गरज नाहीये. नवऱ्यानं बायकोवर आणि बायकोनि नवऱ्यावर depend असलच पाहिजे तरच संसार होईल ना ?? एकमेकांकडून अपेक्षा ठेवणं ह्यात काहीच चूक नाही.

गाडीला किक मारून मी तकाट घरी गेले, त्याला म्हणलं -झाल का नाई तुझं बघून ? नसलं तरी आता बंद कर आपण ice cream खायला चाललोय. .

-अग पण ते तुझ space वगैरे?????
-खोटं असत ते सगळं. चल उठ आता लवकर..
-नाही मी एवढं संपल्याशिवाय उठणार नाही तू जा तुझ्या मैत्रिणी सोबत.

-नाही मला तुझ्या सोबतच जायचंय…😡😡😡😡😡😡झालं…..भांडण सुरू….
आता कस बरं वाटलं .. महिन्यांनी भांडलो.
शेवटी हट्टानी आणि हक्कानी Ice cream खायला न्हेलच त्यांला. आणि आमचा संसार सुखी आहे याची खात्री झाली.

– वैद्य देवकी चौंडे

साभार तुफान पेज

ग्लोबल न्युज नेटवर्क: