तुम्ही ७० वर्षात काय केले याचा हिशेब आणला का ? अमित शहा

गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्यावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक २०२१ चे जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याशी कोणत्याही प्रकारचे घेणे-देणे नाही. योग्य वेळ आल्यानंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येणार’, असे अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

मंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर उत्तर देताना विरोधकांना फैलावर घेतले आहे. ‘या ठिकाणी विचारण्यात आलं की, कलम ३७० हटवल्यानंतर जी आश्वासनं दिली त्या दृष्टीनं काय केलं गेलं? कलम ३७० हटवून १७ महिने झाले आणि तुम्ही आमच्याकडून हिशोब मागत आहात.

तसेच तुम्ही ७० वर्षांत काय केले याचा हिशोब आणलाय का? जर ७० वर्ष योग्यरित्या चालला असता, तर आमच्याकडून हिशोब मागायची वेळ आली नसती’, असे म्हणत अमित शाह यांनी कॉंग्रेसचा समाचार घेतला आहे.

 

Team Global News Marathi: