रावणाच्या वधानंतर मंदोदरी पुढे काय झाले?

रावणाच्या वधानंतर मंदोदरी पुढे काय झाले?

भारतीय संस्कृतीने अनेक प्राचीन साहित्य आणि महान काव्यांच्या स्वरूपामध्ये इतिहासाची एक देणगी संपूर्ण विश्वाला दिली आहे .भारतीय इतिहास हा मानवी मूल्य, नातेसंबंध सामाजिक व्यवस्थापन ,नैतिकता, राजनीति इत्यादी सर्व घटकांना एका साच्यामध्ये बसवणारा आधारस्तंभ आहे. भारतीय प्राचीन इतिहासामध्ये रामायण आणि महाभारत ही दोन पवित्र साहित्य आजही आपल्या वर्तन आणि संस्कृतीचा पाया बनवत आहेत.

रामायण आणि महाभारतामध्ये चरित्र पुरुषांचा देवाच्या रूपाने एक अवतार जन्म होऊन कशाप्रकारे पृथ्वीतलावरील सजीव स्रूष्टी चे प्रस्थान मोक्षाकडे झाले याचे वर्णन आहे. यामुळे या साहित्यामध्ये एक चरित्र पुरुष हा एका खल प्रवृत्तीच्या,दानवी वृत्तीला कशाप्रकारे नैतिकता व संयमी वृत्तीने नष्ट करतो हे आपल्याला पाहायला मिळते .रामायण व महाभारत यांचा पगडा आपल्या समाज मनावर इतका जास्त आहे की निरनिराळ्या चित्रपट व मालिकांमध्ये सुद्धा रामायण हे प्रमुख कथानक म्हणून दाखवले गेले आहे.

दूरदर्शन वर ऐंशीच्या दशकामध्ये दाखवली गेलेली रामायण ही मालिका लाँकडाऊन च्या निमित्ताने पुन्हा प्रसारित करण्यात येत आहे व त्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. प्रत्यक्ष रामायणामध्ये राम आणि सीता यांच्यासोबतच लंकाधिपती रावण हे पात्र खऱ्या अर्थाने रामायण घडण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे होते. राम आणि सीता यांच्या पती-पत्नीच्या संबंधांना आजही एक आदर्श मानले जाते. एका देशाची राजकन्या पतीच्या वनवासा मध्ये त्याच्यासोबत पुढचा मागचा विचार न करता त्याला साथ देण्यासाठी निघते व त्यानंतर रावणाच्या कैदे मध्ये असतानाही आपला पती आपल्याला सुटका करण्यासाठी निश्चित येणार ह्या भरवशावर त्याच्या तपश्चर्या मध्ये गुंगून राहते,


वनवास संपल्यानंतर जी चारित्र्याची अग्निपरीक्षा द्यावी लागल्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा रामा पासून ताटातूट होऊन आयुष्यभर जणूकाही वनवास सहन करते व शेवटी धरणी मातेच्या अंतरंगात स्वतःला सामावून घेते ही सर्व सीतेची रूपे आदर्श पत्नी व मातेच्या रूपात वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आपल्यासमोर येत आहेत. रामायणामध्ये सीतेसोबतच अन्य सुद्धा स्त्रियांनी एक पत्नी म्हणून अर्धांगिनी म्हणून आपल्या पतीला साथ दिली आहे. अशाच काही रामायणामधील स्त्रियांपैकी एक पात्र म्हणजे मंदोदरी होय.

लंकाधिपती रावणाची अर्धांगिनी म्हणजेच मंदोदरी होय. जेव्हा रावणाने सीतेला हरण करून लंकेमध्ये आणले होते तेव्हा आपल्या पतीच्या या वर्तनाबद्दल नक्की मंदोदरी ची काय प्रतिक्रिया होती किंवा रावणाच्या वधानंतर मंदोदरी ने पुढे काय केले याची निरनिराळ्या साहित्यामध्ये व महाकाव्व्यांमध्ये वर्णन करण्यात आली आहेत. आज आपण रावणाच्या वधानंतर मंदोदरी चे पुढे काय झाले याबद्दल माहिती घेणार आहोत.

रावणाच्या वधानंतर मंदोदरी युद्ध स्थळी गेली. त्या ठिकाणी तिला आपल्या पतीचे धारातीर्थी पडलेले शव दिसले. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला कारण तिचे रावणावर म्हणजे आपल्या पतीवर असीम प्रेम आणि भक्ती होती. यावेळी रणांगणावर तिला रामाचे दर्शन झाले। रामाच्या चेहऱ्यावरील तेजोवलय यामध्ये तिला कुठेही शत्रुत्व भावना दिसली नाही। रावणाच्या वधानंतर श्रीरामाने बिभीषणाला लंकेच्या राजसिंहासनावर लंकाधिपती म्हणून बसवण्याचे वचन दिले होते. त्या वचनाला अनुसरून रामाने विभीषणाला लंकेच्या नरेश पदी बसवले होते. त्याच वेळी भगवान श्रीरामांनी मंदोदरीला अत्यंत आदरयुक्त पद्धतीने सांगितले की अजूनही ती संपूर्ण विश्वामध्ये सामर्थ्यशाली व बलशाली म्हणून प्रसिद्ध असलेल्या रावणाची विधवा पत्नी आहे.

तिला सुद्धा राजनीती व राजव्यवहाराचे ज्ञान होते व ती एक निर्णय क्षमता बाळगून असलेली महाराणी होती. म्हणूनच भगवान श्रीरामांनी मंदोदरीला विभिषणासोबत विवाह करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला.रामा कडून रावणाच्या वधानंतर लंकेचा कारभार हा सामंजस्य पूर्वक व प्रभावी पद्धतीने हाताळला जाईल.मात्र भगवान श्रीराम अयोध्येला परतले व मंदोदरीने राजमहालामध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतले आणि बाहेरच्या जगासोबत संपर्क तोडला. त्यानंतर मात्र मंदोदरी स्वतःहून आपल्या कक्षाच्या बाहेर आली व तिने विभिषणा सोबत विवाह करण्याच्या प्रस्तावास होकार दिला. या विवाहाचा पाया हा लंकेच्या राज्यकारभाराला एक दिशा देणे हाच होता जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अंतर्गत कलह होऊन पुढील काळात युद्ध निर्माण होऊ नयेत. विभिषणासोबत लग्न करून पुन्हा एकदा मंदोदरी लंकेची महाराणी बनलीव तिनेसुद्धा लंकेच्या राजदरबारामध्ये आपले योगदान दिले.

मंदोदरी पंचकन्या पैकी एक मानली जात असे जिच्या स्पर्श किंवा नामस्मरणाने पापक्षालन केले जाते .मंदोदरीचे प्राचीन साहित्यामध्ये वर्णन कोमल नाजूक व हुशार असे केले आहे. मंदोदरी ही मयासुर या असुर राजा आणि हेमा या अप्सरा यांची कन्या होती.मंदोदरी ने रावणाला अनेक वेळा सत्याच्या मार्गावर जाण्यास सुचवले होते मात्र रावणाने नेहमीच तिच्या समजावण्याकडे दुर्लक्ष केले.

सीतेचे हरण करून लंकेमध्ये आणल्यानंतर रावणाने सीतेशी विवाह करण्याचा हट्ट धरला होता.त्या वेळीसुद्धा सीते सारख्या एका पवित्र स्त्रीचे शील हरण करून विवाह करण्यापेक्षा दुस-या स्त्रियांसोबत विवाह करुन मन रमवावे असे तिने त्याला वेळोवेळी सांगितले व तीने सीतेला सुद्धा रावणाच्या क्रोधापासून वाचण्यास वेळोवेळी मदत केली मात्र जेव्हा रामासोबत अंतिम युद्धाचा क्षण आला तेव्हा एका कुलीन स्त्रीप्रमाणे मंदोदरी आपल्या पतीच्या बाजूने उभी राहिली. त्याला हरेक प्रकारे या युद्धामध्ये तिने साहाय्य केले यासाठी जेव्हा रावणाने यज्ञ सुरू केला तेव्हा भगवान श्रीरामांच्या वानर सैन्याने मंदोदरी सोबत मुद्दाम होऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून रावणाचा यज्ञ असफल होईल. या सर्व घटना क्रमामध्यही मंदोदरी रावणाची आज्ञाधारक व सदैव साथ देणारी सहचारिणी होती असे स्तुत्य बोल मंदोदरी च्या बाबत रामायणामध्ये केले गेले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: