याचा अर्थ काय ? चंद्रकांतदादांना नाही, पण विखें अन पाटलांना मिळाली अमित शहांची भेट

याचा अर्थ काय ? चंद्रकांतदादांना नाही, पण विखें अन पाटलांना मिळाली अमित शहांची भेट

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह राज्यातील काही नेत्यांनी चार दिवस दिल्लीत तळ ठोकूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना मात्र मंगळवारीच शहा यांची भेट मिळाली. या भेटीत सहकार क्षेत्राविषयी चर्चा झाली. नव्या सहकार मंत्रालयामार्फत काय काय करता येऊ शकते यावर भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. भेट न मिळाल्याने चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह दिल्लीला गेलेले नेते कालच मुंबईत परतले असताना दिल्लीत मात्र विखेंची शहा यांच्याशी भेट झाल्याने पाटील यांना भेट नाकारली गेल्याच्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे.

नुकताच चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली दौरा केला
त्यांनतर बोलताना दिल्ली दौऱ्यात नवीन काही नव्हतं. नेहमीसारखाच हा दौरा होता. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे आणि मी अधूनमधून दिल्लीला जात असतो. पण पक्षातले तरुण नेते फारसे दिल्लीत येत नाही. ही नेक्स्ट जनरेशन देखील उभी केली पाहिजे, असा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यामुळं राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय हा एक ग्रुप घेऊन आम्ही दिल्लीत आलो होतो.

केंद्र सरकारमध्ये नव्यानं मंत्री झालेल्या नेत्यांना भेटलो. त्यांचं अभिनंदन केलं. शुभेच्छा दिल्या. खाती समजून घेतली. पीयूष गोयल, नितीन गडकरी व रावसाहेब दानवे यांच्याही घरी गेलो. संघटनात्मकदृष्ट्या देखील काही भेटी झाल्या. रावसाहेब दानवे यांच्या घरी सोमवारी जेवण झालं. अमित शहा व नरेंद्र मोदी हे दोघे वगळता सर्वांच्या भेटी झाल्या,’ असं पाटील म्हणाले

ग्लोबल न्युज नेटवर्क: