मुंबई | अभिनेता अर्जुन कपूरचा शनिवारी वाढदिवस साजरा झाला. यानिमित्ताने अर्जुनची प्रेयसी मलायका अरोरा हिनेही एक रोमॅन्टिक फोटो शेअर करत, आपल्या अर्जुनला खास शुभेच्छा दिल्यात. पण मलायकाने शेअर केलेल्या या फोटोवर केआरके अर्थात कमाल आर खानची नजर गेली आणि त्याने यानिमित्ताने सलमान खानला डिवचण्याची संधी शोधली आहे.
केआरके’ने ट्विट केले आहे की, ‘भाई, अर्जुन कपूर टायगर है तू. गुर्दा है तेरे में. डंके की चोट पर छीन लिया. सॅल्यूट आपको,’ असे ट्वीट केआरकेने केले. केआरकेचा इशारा सलमान खानाच्या कुटुंबीयांकडे होता, हे लपून राहिले नाही. मात्र काही वेळातच त्याने घुमजाव केला होता. ‘अरे तुम्ही लोक नेहमी चुकीचा अर्थ का काढता? मी तर ‘एक विलन’ हा सिनेमा सिद्धार्थ मल्होत्राकडून हिसकावून घेतल्याबद्दल बोलतोय, आणखी काहीही नाही,’ असा खुलासा त्याने केला.
काही दिवसांपूर्वी केआरकेने ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सलमानच्या ‘राधे-योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाची प्रचंड खिल्ली उडवली होती. हा सिनेमा पाहून माझी तब्येत बिघडली, असे त्याने या सिनेमाचा रिव्ह्यू देताना म्हटले होते. राधे म्हणजे कोरोनाची तिसरी लाट आहे, असेही तो म्हणाला होता. यानंतर सलमानने केआरकेविरूद्ध मानहानीचा दावा ठोकला होता.
Bhai Launde #ArjunKapoor Tiger Hai Tu. Gurda Hai Tere Main. Dunke Ki Chot Par Cheen Liya! Salute you! pic.twitter.com/cL5fT9YrGi
— KRK (@kamaalrkhan) June 26, 2021