तुम्ही काय सुपारी घेवून आला आहे का? आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत ; अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना सुनावले –

तुम्ही काय सुपारी घेवून आला आहे का? आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत ; अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना सुनावले –

किल्ले शिवनेरी : राज्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येत आहे. आज शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र जन्मोत्सव सोहळ्यानंतरच्या भाषणादरम्यान अचानक अजित पवार काही उपस्थित तरुणांवर भडकले. कारण अजितदादांच्या भाषणादरम्यान या तरुणांनी मराठा आरक्षणावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती.

शिवनेरीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह इतर उच्चस्तरीय अधिकारी आमदार आणि खासदार उपस्थित होते. यादरम्यान अजित पवार यांच्या भाषणाला सुरुवात झाली. गड किल्ल्यांचा विकास, निधी आणि अशा विविध मुद्द्यांवर भाष्य करत असताना ते मराठा, मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर बोलू लागले.

यावेळी अचानक एका तरुणाने मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून किती दिवस रेंगाळत राहणार आहे? सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अजून किती दिवस न्याय मिळवण्यासाठी वाट पहावी लागणार आहे, असा सवाल मोठ्याने उपस्थित केला. यानंतर आजित पवार संतापले. त्यांनी तरुणाला खडेबोल सुनावत . मी मघाशी तुमचं ऐकून घेतले. सारखं सारखं बोलायचं नाही. तुम्ही काय कोणाची सुपारी घेवून आला आहे का? आज शिवजयंती आहे, ही पद्धत नाही बोलायची. आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत, आम्हालाही मराठा आरक्षण द्यायचं आहे, असे म्हणाले.

राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही योग स्थापन करुन आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील हायकोर्टात ते आरक्षण टिकलं, मात्र सुप्रीम कोर्टात ते फेटाळले. सुप्रीम कोर्टाची भूमिका ५० टक्के वर आरक्षण नको अशी आहे. मात्र यासाठी केंद्राने पुढाकार घेत कायदा करुन ५० टक्केवर आरक्षण द्यायला लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात पंतप्रधानांना भेटून त्यांना सांगण्याचं काम झालं आहे.

त्यांनी चर्चा करुन सांगितलं की करून सांगतो, मात्र तरुण मुलांच रक्त सळसळ करतं मात्र बारकावे समजून घेतलं पाहिजे, असा सल्लाही अजित पवार यांनी तरुणांना दिला. सर्व जातींना पुढे घेऊन जायचे , ही शिवरायांची शिकवण आहे, असेही ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: