‘मी काय कुंद्रा आहे का? असं का म्हणाले राज ठाकरे वाचा !

 

पुणे महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना पक्ष बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर असून यावेळी ते शाखा अध्यक्षांशी समोरासमोर बातचीत करणार आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत आज एक मिश्किल टिप्पणी केली.

राज ठाकरे पुण्यातील कार्यालयात दाखल झाल्यावर सर्व पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो आणि कटवेज घेण्यासाठी गर्दी केली. बराचवेळ फोटोग्राफर फोटोज क्लिक करत होते हे पाहून राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. फोटोग्राफर्सकडे पाहून राज ठाकरेंनी हसत म्हटलं, सर्व कालं का कान नाक? किती वेळा तेच तेच. मी काय कुंद्रा आहे का? अशी टिपण्णी त्यांनी केली होती.

मनसेप्रमुख राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात ते मनसेच्या १५२ शाखाध्यक्षांशी वन टू वन बोलणार आहेत. तसेच मनसेमधील गटअध्यक्ष या राजदूत म्हणून जबाबगारी सोपवली जाणार आहे. हे राजदूत यापुढे कायम मतदारांशी संपर्क ठेवून मनसेची ध्येय धोरणं पटवून देतील.

Team Global News Marathi: