या मुद्द्यावर कारणासाठी ममता दिदींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

 

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाचा पराभव करून विजय मिळवला होता. आता या निवडणुकीत बॅनर्जी आणि मोदी यांच्यात शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळाली होती.

त्यातच एकमेकांचे राजकीय विरोधक मानले जाणारे ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही केवळ एक औपचारिक भेट असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. या भेटीत कोरोना रूग्णसंख्या, लसीकरण आणि कोरोना रूग्णांना लागणाऱ्या औषधांचा मुद्दा उपस्थित केल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षापासून पश्चिम बंगालचं नामांतर करण्याची मागणी होत आहे. पश्चिम बंगालचं नाव बदलून ‘बांगला’ असं करण्यात यावं, अशी मागणी करण्यात येत आहे. तर पश्चिम बंगालच्या विधानसेभेत याबद्द्लचा ठराव देखील पास करण्यात आला आहे. त्याविषयी देखील मोदींशी चर्चा झाल्याचं ममतांनी सांगितलं, तर मोदींनी त्यावर ‘मी बघतो’ असं सकारात्मक उत्तर देखील दिलं आहे.

 

Team Global News Marathi: