पश्चिम महाराष्ट्रातील नेते मला टार्गेट करतायत, आमदार प्रशांत बंब यांनी लगावला आरोप

पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांनी मला लक्ष्य करण्यासाठी गंगापूर साखर कारखान्याच्या घोटाळ्यात माझे नाव गोवले आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी केला.

पुढे बोलताना बंब म्हणले की, मी सातत्याने मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न मांडत असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही नेते मला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. ते शुक्रवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गंगापूर साखर कारखाना घोटाळाप्रकरणी माझ्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा या कटाचा भाग आहे. गंगापूर साखर कारखाना हडप करण्यासाठी हा सगळा आरोप केला जात आहे. आपल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यातील सर्वोच्च नेत्याने दबाव आणला असल्याचा धक्कादायक आरोपही प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

Team Global News Marathi: