राज्यातलं ठाकरे सरकार विश्वासघातकी सरकार – गोपीचंद पडळकर

एमपीएससी परीक्षेची तारीख राज्य सरकारकडून पुढे ढकलण्यात आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर, नाशिक आदी शहरांत एमपीएससी परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते या झालेल्या गोंधळावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

पडळकर म्हणाले की, आघाडी सरकारचा कॉमन मिनीमन प्रोग्रामपैकी “विश्वासघात” हा एक प्रोग्राम असून जनतेशी हे सरकार प्रत्येक दिवशी नवीन विश्वासघात करतं आलंय. यामध्ये मराठा आरक्षण असेल तर कधी धनगर समाजाला निधी देण्याच्या बाबतीत तर कधी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाच्या बाबतीत तर कधी वीजबील संदर्भात माफी करतो, असं म्हणत सरकार सामान्य जनतेचा विश्वासघात करताना दिसतंय अशी टीका केली होती.

एमपीएससी मुद्द्यावरून टीका करताना ते म्हणाले की, एमपीएससी परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने बदलला तेव्हा विद्यार्थ्यांसह मी रस्त्यावर उतरलो. मी काय पाकिस्तानातून आलोय का? या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरल्यावर हजारो पोलीस येतात, एमपीएससी विद्यार्थ्यांना लाठी चार्ज करतात ते विद्यार्थी काय लादेन समर्थक होते का? असा सवाल त्यांनी यावेली उपस्थितीत केला होता.

Team Global News Marathi: