मुंबई | गायिका नेहा कक्करने स्वताच्या आवाजाच्या जीवावर तिनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच टीका अनेकदा गरिबांना मदत करताना सुद्धा पाहण्यात आले आले आहे असं असल तरी ता जुने दिवस विसलेली नाही. आजही ती गरिबांना मदत करताना दिसते.
मात्र यावेळी तिला मदत करण जरा चांगलच महागात पडलं आहे. 500-500 च्या नोटा वाटताना दिसली नेहा कक्कर नेहा कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी तिनं लोकांना कारमधूनच 500-500 च्या नोटा वाटायला सुरूवात केली.
विशेष म्हणजे तिनं जसे पैसे वाटायला सुरूवात केली तशी बघता बघता कारजवळ गर्दी जमा झाली. पैसे घेण्यासाठी झुंबड उडाली. यानंतर काहींनी पैसे घेण्यासाठी हात पुढे घेतले यावेळी काहीशी झपटाझपटी झाली. हा सगळा गोंधळ पाहून नेहा घाबरली कारमध्ये मागे सरकली व कारची काच बंद करून तिथून निघून गेली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.