शाब्बास रोहित!! रोहित पवारांनी केले रोहित आर. आर. पाटलांचे कौतुक

 

सांगली | कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत सर्व विरोधकांना पराभवाची धूळ चारत माजी गृहमंत्री तथा दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी सत्ता काबीज केली. या विजयानंतर त्यांच्यावर राज्यभरातुन कौतुकांचा वर्षाव होत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील रोहित पाटील यांच्यावर कौतुकाची थाप मारली. रोहित पवार यांनी ट्विट करत रोहित पाटील यांचे कौतुक केले. शाब्बास रोहित!! खूप खूप अभिनंदन अस म्हणत त्यांनी शाबासकी दिली.

कवठे महांकाळ येथे १३ जागांसाठी नगरपंचायत निवडणूक लागली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागांवर विजय मिळवला आहे. आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधक येकवटले होते. तरीही रोहित पाटील यांनी एकहाती विजय मिळवत विरोधकांना अस्मान दाखवलं.

Team Global News Marathi: