एकनाथ खडसेंना जोरदार झटका, शिवसेनेने मिळवली एकहाती सत्ता

 

जळगाव | नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे तरी जळगावात त्यांना एक धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

या निकालामुळे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा धक्का आहे. १७ जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक म्हणजेच ९ जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे आता बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे.

एकनाथ खडसेंना मोठा धक्का बोदवड नगरपंचायतीसाठी सुरू असलेल्या मतदानाची मोजणी सकाळी दहा वाजता सुरू झाली. पहिल्‍या फेरीपासून राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी ठेवली होती. बोदवडमध्‍ये सत्‍ता असलेल्‍या भाजपला मात्र केवळ खाते उघडता आले आहे.

मात्र मुक्‍ताईनगर मतदार संघ असलेल्‍या चंद्रकांत पाटील यांच्‍या उमेदवारांनी नंतरच्‍या फेरींमध्‍ये बाजी पलटवली. यात राष्‍ट्रवादी काँग्रेसला मागे टाकत शिवसेना पुढे गेली आहे. अखेर शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला होता. यावर अद्यापि खडसे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

Team Global News Marathi: