प्रताप सरनाईक काय साधुसंत नाही, नारायण राणे यांची घणाघाती टीका

प्रताप सरनाईक काय साधुसंत नाही, नारायण राणे यांची घणाघाती टीका

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचनालयाने सकाळी धाड टाकली. आमदार सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला होतील. तसेच त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले होते त्यात विहंग नाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी भाष्य केले आहे.

दरम्यान, ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली. ‘मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.

आता ईडी कडून करण्यात आलेल्या कारवाहीवर खासदार नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. “कायदेशीर गोष्टींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचे नसते. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ” असे नारायण राणे यांनी पत्रकार माध्यमांना प्रतिकिया दिली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: