आम्ही काही धर्मार्थ दवाखाना सुरू केला नाही, राजकारण असंच असतं; खडसेंचा महाजनांना टोला

 

जळगाव |  माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही भाजपाला सोडचिट्टी देऊन राष्ट्र्वादीत प्रवेश केल्यानंतर भाजपा-राष्ट्र्वादीत अर्थात खडसे आणि महाजन यांच्यातील वाद वाढले होते. त्यातच जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकीत भाजपला हार पत्करावी लागली होती. या पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने यू-टर्न घेतल्यानेच आमची कोंडी झाली, असं महाजन म्हणाले होते. त्यावर, आम्ही काही धर्मार्थ दवाखाना सुरू केलेला नाही. राजकारण असंच असतं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यलयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री गिरीश महाजन पैसे लावतील अशी उमेदवारांना आशा होती. पण त्यांचा नाऊमेद झाला आहे. उमेदवार मात्र त्यांनी दहा कोटी लावले तर मी वीस कोटी लावेल, नाथाभाऊ बसला आहे, तुम्ही फक्त लढा असे म्हणत मी नाउमेद असणाऱ्यांना जिल्हा बँक निवडणूक लढायला लावली, असं खडसे म्हणाले.

ऐन निवडणुकीच्या काळात मी दवाखान्यात होतो. त्यावेळी भाजपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही असा शब्द मी दिला होता. आम्ही योग्य वेळी आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात केली. त्यानंतर विजयही मिळवला आणि शब्द खरा करून दाखवला, असंही त्यांनी सांगितलं या टीकेला महाजन काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे,

Team Global News Marathi: