रात्री उशिरापर्यंत मोबाइल स्क्रीन पाहताय? वेळीच सावध व्हा,

 

आज काल बरेच जण रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर ऑनलाइन असतात. झोपण्यापूर्वी मोबाइल पाहण्याची सवय बहुतांश जणांना असते, ज्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो; मात्र या सवयीमुळे केवळ डोळ्यांचंच नाही, तर आणखीही बरंच नुकसान होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

मोबाइलमधून येणारा निळा प्रकाश, तसंच लॅपटॉप आणि एलईडी स्क्रीनमधून येणारा प्रकाश हा अप्रत्यक्षरीत्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढवत असल्याचं संशोधनात दिसलं आहे. खरं तर संशोधकांनी हा प्रयोग उंदरांवर केला आहे; पण आपलं शरीर आणि उंदरांचं शरीर यात ८० टक्के हार्मोनल आणि फिजिओलॉजिकल समानता आहे. त्यामुळे कित्येक औषधांची मानवी चाचणी होण्यापूर्वी उंदरांवर त्याची चाचणी करण्यात येते.

तसंच, आतापर्यंत उंदरांवर यशस्वी झालेले जवळपास १०० टक्के प्रयोग मानवांवरही यशस्वी झाले आहेत. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. स्ट्रासबर्ग विद्यापीठ आणि अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठातल्या संशोधकांनी संयुक्तपणे याबाबत संशोधन केलं आहे.

संशोधकांनी उंदरांवर केलेल्या एका प्रयोगातून ही बाब सिद्ध झाली आहे. वैज्ञानिकांनी उंदरांना रात्रीच्या वेळी आर्टिफिशिअल प्रकाशासमोर ठेवलं. यामुळे त्यांची गोड खाण्याची क्रेव्हिंग्ज आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाणही वाढल्याचं दिसून आलं. यासोबतच, जास्त वेळ लाइटच्या समोर राहिल्यामुळे त्यांच्या वजनामध्येही वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

Team Global News Marathi: