नैसर्गिक आपत्तीवर स्वतंत्र मंत्रालय हवे – देवेंद्र फडणवीस

 

कराड | भूस्खलन व नैसर्गिक आपत्ती हे सखोल संशोधनाचे विषय बनले असून, त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आराखडय़ाची, स्वतंत्र मंत्रालयाचीही गरज असल्याची सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पश्चिम घाटातील अतिवृष्टी आणि दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.

नियमबा वाढते नागरीकरण तसेच तीन दिवसांत वर्षांचा आणि एका दिवसात महिन्याचा पाऊस पडू लागल्याबाबत फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. दोन वर्षांत राज्यावर तीनवेळा नैसर्गिक आपत्ती आली. यावरून आपत्तींचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. याचा शासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

आपण मुख्यमंत्री असताना जागतिक बँकेच्या सहाय्याने धरणे, नद्यांचे पाणी कालव्याने दुष्काळी भागांना देण्याची योजना आखली होती. ही योजना पूर्ण होण्यास सात वर्षे लागली असती. मात्र, यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय सद्याच्या स्थितीत दिसत नाही. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर शासनाकडे अनेक अभ्यासक तसेच तज्ज्ञांचे अहवाल येतात. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

Team Global News Marathi: