“Pegasus Snoopgate केवळ राजकारणी, पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतच मर्यादित नाही”

 

सध्या देशभरात पेगॅसस हेरगिरी प्रकरण चांगलेच गाजत असून याच मुद्द्यावरून सर्व विरोधक मोदी सरकार विरोधात एकत्र आले आहेत. त्यात मागच्या काही दिवसांपासून इंधनदरवाढ, महागाई, बेरोजगारी, कोरोना परिस्थिती यावरून मोदी सरकारवर विरोधक टीका करत असताना यामध्ये आता पॅगेसस हेरगिरी प्रकरणाची भर पडली असून, विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

तसेच संसदेतही या प्रकरणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकदा कामकाज तहकूब करावे लागले आहे. यातच आता राष्ट्रवादीकडूनही याच मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली असून, विचार करण्याचा सल्ला सामान्य नागरिकांना दिल्याचे म्हटले जात आहे.

देशभरातील काही राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचे उघड झाले. तसेच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांझी यांचा फोनही या तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचे समोर आले. यानंतर विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती,

यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, सर्वसामान्य नागरिकांना सल्ला दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. सरकार तुमचे WhatsApp चॅट, SMS वाचतेय. तुमचे व्हिडिओ आणि फोटो, इमेल, मेडिकल रेकॉर्ड, पेमेंट हिस्ट्री, संपर्क क्रमांक पाहातेय.Pegasus Snoopgate केवळ राजकारणी, पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतच मर्यादित नाही. ते तुमच्याबद्दलही आहे. विचार करा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

 

Team Global News Marathi: