2024 नंतरच्या राजकारणाची सूत्र आपल्याकडेच; रोहित पवारांचं सूचक विधानाने राष्ट्रवादीत खळबळ

 

 

2024 नंतरच्या राजकारणाची सूत्र आपल्याकडेच; रोहित पवारांचं सूचक विधानाने राष्ट्रवादीत खळबळ

 

मुंबई : येत्या काळातील राजकारणाची सूत्र ही आपल्याच हाती असतील असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. एवढेच नाहीतर तर राष्ट्रवादीचे अध्य्क्ष शरद पवार आणि अजित पवार हे मार्गदर्शकाच्या रूपात असतील पण निर्णय आपल्याला घ्यावा लागेल असेदेखील रोहित पवार (Rohit Pawar) यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

रोहित पवार आज जुन्नर दौऱ्यावर होते तिथं जुन्नर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.

 

राजकारणात येताना मी खूप पुढचा विचार करुन आलोय. पदासाठी नाही मात्र या महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. मात्र, लांबचं राजकारण करत असताना सहकारी मित्रांना कधीच विसरणार नाही, असं म्हणत रोहित पवारांनी पुढची राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्र आपल्याच हाती येणार असल्याचं स्पष्ट संकेतच त्यांनी दिले.

 

आम्ही कायम जमिनीवरच राहणार आहोत. जमिनीवर राहण्याची मागच्या पिढीचा शिकवण स्विकारुन ती आत्मसात केली आहे. 2024 पर्यंत याच शिकवणीतून आम्ही चालणार आहोत. मात्र, 2024 नंतरचा काळ हा युवकांचा काळ आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपण घेणार, यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच पण निर्णय मात्र नवीन पिढीचे रहाणार आहेत, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

 

रोहित पवारांचे (Rohit Pawar) हे विधान भविष्य दर्शक सूचक विधान आहे. आता शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार रोहित पवारांच्या या विधानाकडे कशा रीतीने पाहतात याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. रोहित पवारांच्या (Rohit Pawar) अगोदर अजित पवार यांनीदेखील अशाच प्रकारचे सूचक वक्तव्य केले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: