भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

 

कोल्हापूर – भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली व त्यांचा परिवार आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आईंनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच आमदार पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. 24) जुलै रोजी रात्री 8.30 वा कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: