‘आम्हाला काँग्रेसमधला कचरा नकोय, नाहीतर…’, अरविंद केजरीवाल यांनी साधला काँग्रेसवर निशाणा

 

पंजाब | पंजाब विधानसभानिवडणुकीला अव्हघे काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच आम आदमी पक्षांनी सुद्धा आता जोरदार तयारी सुरु केली असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या पंजाबच्या दारूअवेर आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर घणाघाती टीका करताना काँग्रेसवर सुद्धा निशाणा साधला आहे.

अमृतसरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी काँग्रेसचे आमदार आणि खासदारांबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “आम्हाला आमच्या पक्षात काँग्रसमधला कचरा नकोय, नाहीतर आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आणि दोन-तीन खासदार आम आदमी पक्षात दिसले असते”, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

“ज्या नेत्याला निवडणुकीचं तिकीट मिळत नाही तो पक्षावर नाराज होत असतो आणि हे प्रत्येक पक्षात होत असते. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जातात. काही जण तयार होतात आणि काहींची मनधरणी करण्यात यश येत नाहीत. असे लोक दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग स्वीकारतात. काँग्रेसमधले असे बरेच नेते आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. पण आम्हाला काँग्रेसमधला कचरा आमच्या पक्षात नकोय”, असं रोखठोक वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

“आम्ही जर काँग्रेसमधला कचरा आमच्या पक्षात घेण्यास सुरुवात केली तर मी ठामपणे सांगू शकतो की आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आमच्या पक्षात दिसले असते. तुम्हाला जर त्यांचे किती आणि आमचे किती अशी स्पर्धाच जर करायची आहे. तर आमचे तर दोनच आमदार तिथं गेलेत. पण त्यांचे २५ आमदार आणि दोन-तीन खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना आमच्या पक्षात यायचं आहे. पण हे वाईट राजकारण आहे आणि यात आम्हाला पडायचं नाही”, असं केजरीवाल म्हणाले.

Team Global News Marathi: