वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता या नेत्याने दिले स्पष्टीकरण

‘मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर दबाव आणला होता असा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथील पत्रकार परिषदे त केला होता. आता या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जोरदार शब्दांत समर्थन केले आहे.

मंत्री नवाब मलिक या प्रकरणात बोलताना म्हणाले की, सचिन वाझे यांना सेवेत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा दबाव होता, हा आरोप अक्षरशः चुकीचा आहे. अशाप्रकारे कोणताही दबाव फडणवीस यांच्यावर टाकण्यात आला नव्हता, असे मलिक यांनी बोलून दाखविले होते.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कुणीही आग्रह धरला नव्हता. वाझे हे थेट आयुक्तांना रिपोर्ट करायचे. त्यामुळेच कुठेतरी तेही जबाबदार ठरतात व त्यातूनच त्यांची आता बदली करण्यात आली आहे, असेही मलिक यांनी नमूद केले.

Team Global News Marathi: