तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्याच मंत्र्यांवर पाळक ठेवली होती

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार आरोप लगावले होते. यावेळी त्यांनी वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यास उद्धव शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी दबाव आणला होता असा खळबळजनक आरोप फडणवीसांनी केला होता. आता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांना राष्ट्र्वादीने सुद्धा सडेतोड उत्तर दिले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असताना त्यांच्या अनेक निर्णयावर आता राष्ट्र्वादीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना माहिती महासंचालक पदावर पोलीस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत’, असा आरोप राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलिस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत. असे ट्विट राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: