वाझे शिवसेनेशी संबंधित, त्यात चूक काय – संजय राऊत

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची NIA कडून चौकशी करून अटक करण्यात आली होती. वाझे यांच्या अटकेमुळे विरोधकांनीं शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. वाझे आणि शिवसेना यांच्यातील संबंधावर बोट ठेऊन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता.

आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला होता. जर एखादी व्यक्ती पूर्वी शिवसेना किंवा राजकीय पक्षासी संबंधित असेल तर चुकीचं आहे का? शिवसेना ही बंदी घातलेली संघटना नाही. प्रत्येक मराठी माणूस शिवसेनेशी संबंधित आहे असे बोलून विरोधकांच्या टीकेचा राऊतांनी समाचार घेतला.

पुढे एल्गार परिषदेत भाष्य केल्यामुळे चर्चेत आलेला शार्जीलवर बोलताना राऊत म्हणाले की, शार्जील इमाम नावाचे सदगृहस्थ उत्तर प्रदेश सरकारचे. त्यांच्याच राज्यात आराम करत आहेत, योगी सरकारने पकडून महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असा टोला त्यांनी लगावला होता.

पैलवान चितपट झाला बोट वरती आहे, पण मी हरलो नाही असं देवेंद्र फडणवीस कोणत्या पैलवानाबद्दल म्हणाले, हे त्यांनी सांगावं. जर ते सरकारविषयी बोलत असतील तर सरकार साडेतीन वर्ष चितपट करायला कोणालाही जमणार नाही, असे राऊत यांनी यावेळी नमूद केले होते.

Team Global News Marathi: