वाढलेले पोट कमी करायचे आहे ; या 6 सोप्या पद्धती ठरतील प्रभावी

वाढलेले पोट कमी करायचे आहे ; या 6 सोप्या पद्धती ठरतील प्रभावी

नवी दिल्ली : पोटाची वाढलेली चरबी आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. पोटाची चरबी वाढल्याने आपले व्यक्तिमत्व (personality) पण खराब दिसते आणि आरोग्याला विविध व्याधींचा त्रास होतो. बदललेल्या जीवनशैलीमुळे पोटाच्या चरबीची समस्या आता लहान मुले आणि तरुणांमध्येही दिसून येत आहे. पोटाची चरबी वाढल्याने मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो. या समस्येचे कारण थेट आपल्या खाण्याच्या सवयी आणि नियमित जीवनशैलीशी (Ways to Lose Belly Fat) संबंधित आहे.

पोटाच्या चरबीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी ते डाएटिंग आणि व्यायामाचा घरगुती उपाय करतात. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, पोटाची चरबी 6 सोप्या पद्धतीनं कमी करता येते. या सर्व पद्धती सायन्सवर आधारित आहेत.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा

1. साखर खाणं (गोड पदार्थ) टाळा – साखर आणि साखरेपासून बनवलेले पदार्थ वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. पोटाची चरबी कमी करायची असेल तर साखर आणि साखरयुक्त पदार्थ-पेयांपासून लांबच रहा. चयापचय आरोग्यासाठी जोडलेली साखर अत्यंत हानिकारक असल्याचे अनेक अभ्यासांतून समोर आलं आहे.

2. अधिक प्रथिनं खा – वजन कमी करण्यासाठी प्रथिनं हा एक महत्त्वाचा घटक आहे. पोटावर चरबी वाढली असेल, तर तुमच्या रोजच्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. जास्त प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्याने सतत खाण्याची इच्छाही खूप कमी होते आणि पोट सतत भरलेले वाटते.

3. कमी कार्बोहायड्रेट घ्या – आपल्या दिनचर्येत कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने देखील पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. लो-कार्बयुक्त आहार घेतल्यास त्याचा परिणाम शरीरावर लवकरच दिसून येतो.

4. फायबरयुक्त अन्न घ्या – पोटावरील चरबी घालवण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचा अवश्य समावेश करा. जास्त प्रमाणात फायबरचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तथापि, वजन कमी करण्यात कोणत्या प्रकारचे फायबर महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.

5. रोजचा व्यायाम महत्वाचा – वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायामाची गरज आहे. कोरोनामुळे बाहेर पडून व्यायाम करता येत नसेल तर घरातच खोलीमध्ये व्यायाम करणे देखील खूप प्रभावी आहे. सहसा आपण डाएटिंग करतो पण व्यायाम करत नाही, पण जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल, तर तुमच्या रोजच्या दिनचर्येत पोटाच्या व्यायाम प्रकारांचा समावेश करा.

6. खाण्या-पिण्याकडे लक्ष हवे – हे थोडे विचित्र वाटत असले तरी आपण काय खात आहोत आणि त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, याकडे आपले लक्ष असायला हवे. बरेच लोक या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि जे खात आहेत तेच लठ्ठपणाचे कारण बनू शकते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: