फणसाचे गरे खा आणि तंदुरुस्त राहा : वाचा सविस्तर

फणसाचे गरे खा आणि तंदुरुस्त राहा : वाचा सविस्तर

महाराष्ट्रात सामान्यतः वटपौर्णिमेच्या दिवशी फणसाला फार जास्त महत्त्व दिलं जातं. पण, फणस हे असं फळ किंवा अशी भाजी आहेत ज्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आपल्यातील अनेकांना ज्ञात नाहीत. आज आपण या फळाचे काही गुणकारी गुणधर्म जाणून घेऊ

१. फणसात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. विटॅमीन ए, सी, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह यांचा फणसात मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

२. पिकलेल्या फणसाचा पल्प करुन तो पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास ताजेतवाने तर वाटतेच, पण हृदयाचे विकार जडलेल्या व्यक्तींना त्याचा फायदाही होतो.

 

३. फणसात मोठ्या प्रमाणावर असणारे पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरू शकतो.

४. भरपूर प्रमाणात लोह असल्याने अॅनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचं ठरतं.

५. थायरॉइडचा त्रास असणाऱ्या लोकांनी फणस खाणे फायद्याचे आहे. यात असलेले खनिज आणि तांबे थायरॉइड नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.

 

६. हाडांसाठी फणस खाणे खूप गुणकारी असते. या फळात असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शिअम हाडांसाठी गुणकारी असते.

७. फणसात असलेले विटॅमीन ए आणि सी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका यामुळे कमी होऊ शकतो.

८. फणसात असणारे विटॅमीन ए डोळ्यांची शक्ती चांगली ठेवते. तसेच त्वचा उजळण्यासाठीसुद्धा तो फायदेशीर ठरते.
संकलन- नचिकेत घरत

ग्लोबल न्युज नेटवर्क: