वानखेडे यांच्या दुसऱ्या पत्नीचा मी कधीच नाव घेतलेलं नाहीये – नवाब मलिक

 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वाढ आता शिगेला पोहचले आहे. वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मलिक विरोधात मागासवर्गीय अयोग्य तसेच कोर्टात पोहचले आहेत. तसेच मलिक रोज पत्रकार परिषेद घेऊन वानखेडे आणि कुटुंबियांवर अनेक खुलासे करताना दिसून येत आहे. त्या आर्यन खानला जमीन मिळाल्यानंतर मलिक अधिक अधिकच आक्रमक झाले आहेत. मलिक यांनी लढाई पुढं सुरू ठेवणार असल्याचं सांगतानाच समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

समीर वानखेडे यांच्या कथित गैरकृत्यांचे पुरावे म्हणून नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांत वानखेडे यांच्या कुटुंबातील अनेकांचे फोटो शेअर केले होते. वानखेडे यांची पहिली पत्नी शबाना कुरेशी हिचा लग्नातील फोटोही त्यांनी शेअर केला होता. याशिवाय, वानखेडे यांच्या बहिणीचा फोटोही शेअर केला होता. त्यावरून वानखेडे कुटुंबीयांनी त्यांच्यावर टीका केली होती. मलिक हे विनाकारण आमच्या कुटुंबाला वादात ओढत आहेत. त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करू, असा इशाराही वानखेडे कुटुंबानं दिला होता. या सगळ्या आरोपांना मलिक यांनी आज उत्तर दिलं.

मलिक म्हणाले की, वानखेडेंनी सगळे हातखंडे वापरून पाहिलेत. माझ्या कुटुंबावर निराधार आरोप केले जाताहेत असं त्यांचं म्हणणं होतं. पण माझी लढाई कुणाच्या कुटुंबाविरुद्ध किंवा धर्माशी संबंधित नाही. माझी लढाई अन्यायाविरुद्ध आहे. मुंबईच्या तुरुंगात आजही १०० पेक्षा अधिक लोक असे आहेत, ज्यांना चुकीच्या पद्धतीनं अडकवलं गेलंय. त्यांची सुटका होईपर्यंत ही लढाई सुरू राहील,’ असं मलिक म्हणाले.

Team Global News Marathi: