काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीएस बाली यांचं निधन !

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीएस बाली यांनी आज अखेरचा श्वास घेतला असून यांचे आज शनिवारी वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जीएस बाली यांचं पार्थिव शनिवारी एअर अॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीहून कांगडा येथे नेण्यात येणार आहे. जीएस बाली यांचा मुलगा रघुबीर सिंह बाली यांनी वडिलांच्या निधनाची माहिती दिलीय.

रघुबीर सिंह बाली म्हणाले, अतिशय दुःखी अंतःकरणानं कळवावं लागतंय, की माझे वडील आणि तुम्हा सर्वांचे प्रिय जीएस बाली आता आमच्यात राहिले नाहीत. काल रात्री त्यांनी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. जीएस बाली नगरोटा बगवां विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. 1998 मध्ये त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विधानसभेत पोहोचले.

त्यानंतर २००३, २००७ आणि २०१२ मध्ये त्यांना चौथ्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली. बाली २००३ मध्ये परिवहन मंत्रीही होते. ते हिमाचल सिव्हिल रिफॉर्म्स सभेचे संस्थापक प्रमुखही होते. यासोबतच बाली हिमाचल सोशल बॉडी फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्या जाण्याने हिमाचलप्रदेश काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे

Team Global News Marathi: