वानखेडे यांचे पहिला निकाह लावणाऱ्या मौलवींचा दावा दोघे मुस्लीम होत म्हणूनच…..

 

ड्रग्स प्रकरणात प्र्काशझोतात आलेलेएनसीबी अधिकारी समीर वानखडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरु झाले आहे. त्याच मलिक यांनी अनेक गंभीर आणि खळबळजनक आरोप वानखेडे यांच्यावर लावले आहे. त्यातच आता समीर वानखेडे यांचे पहिले लग्न लावणाऱ्या मौलाना मुजम्मिल अहमद यांनी त्यांच्या जातीबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे.

समीर वानखेडे आणि त्यांचे वडील हे मुस्लीमधर्मीय होते. त्यामुळेच त्यांचा शबाना कुरेशी यांचा निकाह लावण्याला परवानगी देण्यात आली. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील मुस्लीम नसते तर कोणत्याही काझीने निकाह लावूनच दिला नसता, असे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी सांगितले. मुजम्मिल अहमद यांनीच २००६ साली समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह लावून दिला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बुधवारी सकाळी हा निकाहनामाही ट्विटवरवर शेअर केला होता. आता हा निकाह लावून देणाऱ्यानेच समीर वानखेडे मुस्लीम असल्याचे सांगितल्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. मुलगा-मुलगी ज्यावेळेस निकाहसाठी येतात. त्यावेळेस त्यांच्याकडून फॉर्म भरुन घेतला जातो. त्यात बघितलं जातं की मुलगा मुसलमान आहे की नाही, त्याचा बाप मुसलमान आहे की नाही, नंतरच निकाह केला जातो. आधीच माहिती घेतली जात नाही. माहिती तर त्यानं घ्यायची असते ज्याला आपल्या मुलीचा निकाह करायचा आहे. आम्ही एवढच बघतो की मुलगा-मुलगी मुसलमान आहेत की नाही, आणि ते असतील तर ते राजी असतील तर निकाह केला जातो, असे मुजम्मिल अहमद यांनी सांगितले.

Team Global News Marathi: