वाट कसली बघताय मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा – चित्रा वाघ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपा नेत्या चित्राताई वाघ यांनी मंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणी घेतले आहे. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी देखील चित्रा वाघ यांनी केली आहे. पोलिसांनी वाट न बघता थेट संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर दोन दिवसात जी काही माहिती समोर येत आहे. तसेच ऑडिओ क्लिप सोशल मीडियाच्या माध्यमातून वायरल होत आहे या सर्व क्लिप धक्कदायक आहे. या सर्व गोष्टीत आता संजय राठोड यांचे नाव पुढे येत आहे.

आज भाषणात महिला सुरक्षेवर बोलणं फार सोपे असते. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करावी. एवढे पुरावे असताना तुम्ही आता वाट कुणाची बघत आहात? अशा लोकांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात” असा सणात व्यक्त करत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे.

Team Global News Marathi: