आत ईडीच्या रडारवर राज कपूर यांचा नातू

टॉप सिक्युरिटी विदेशी चलन घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने विहंग सरनाईक यांची चौकशी केली होती. विहंग हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा आहे. आता या प्रकरणी आणखी एक नाव पुढे येत आहे. ते नाव आहे राज कपूर यांचा नातू अरमान जैन, सध्या अरमान जैन हा ईडीच्या रडारवर आहे.

टॉप सिक्युरिटी या खासगी सुरक्षा रक्षक संस्थेला कंत्राट देताना गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या कंपनीच्या संचालकांनी परदेशी रक्कमेचा घोटाळा केल्याने त्या सबंधितांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू होती. त्यात आता विहंग सरनाईक आणि अरमान जैन यांच्यात आर्थिक संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अरमान जैन व विहंग सरनाईक हे मित्र आहेत. या दोघांचे व्हाट्सअप चॅट ईडीला मिळाले आहे. त्या चॅटमध्ये दोघेही आर्थिक देवाणघेवाणीबाबत बोलत असल्याचे दिसून येत आहे. त्याआधारे ईडीने अरमानच्या घरी छापा टाकला होता. त्यात काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली. त्यामुळेच आता त्याला चौकशीसाठी बोलवले आहे. अरमान हा राज कपूर यांच्या मुलीचा मुलगा आहे.

Team Global News Marathi: