‘विठ्ठलभक्तीचा सांस्कृतिक वारसा, ट्विट करून शरद पवारांनी दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा |

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सपत्नीक पहाटे 2.30 वाजता शासकीय विठ्ठल पूजा केली. त्यावेळीही, बा विठ्ठला, कोरोनाचं संकट दूर कर, अशीच प्रार्थना केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा तमाम जनतेला दिल्या आहेत.

या संदर्भात ते ट्विट करून म्हणतात की, संत संप्रदायाची शिकवण आणि मानवा-मानवांतील एकात्मतेची वीण घट्ट करणाऱ्या आषाढी एकादशीच्या सणाचे मोठे महत्त्व आहे. महाराष्ट्रात तळागाळापर्यंत झिरपलेल्या भक्तीरसाचा हा सांस्कृतिक वारसा आहे. तो असाच वृद्धिंगत होत राहो या सदिच्छेसह सर्व विठ्ठलभक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. असे ट्विट त्यांनी केले आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शुभेच्छा दिला आहेत. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे, असेही मोदींनी म्हटलं आहे.

 

Team Global News Marathi: