विश्वासदर्शक ठरावाला अनुपस्थित राहिलेल्या काँग्रेसच्या ९ आमदारांना नोटीस

 

विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळेस अनुपस्थित राहाणार्‍या नऊ आमदारांना काँग्रेसने नोटीस बजावली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस काँग्रेसने व्हीप बजावला होता.

मात्र या विश्वशदर्शक ठरावावेळी प्रणीती शिंदे व जितेश अंतापूरकर यांनी अनुपस्थितीबाबत काँग्रेस पक्षाला पूर्वकल्पना दिली होती; पण अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, कुणाल पाटील, शिरीष चौधरी, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख, राजू आवळे, मोहन हंबर्डे व अन्य एका आमदाराला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या नद्या नेत्यांनी यांच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस व्होटिंगच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मागणीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेतील अनुपस्थिती व क्रॉस व्होटींगची दखल घेतली असून पुढील काही दिवसांत काँग्रेसमध्ये फेरबदलाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Team Global News Marathi: